माता रमाई आंबेडकर उद्यान नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल

सांगली, दि. २८,  सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत होत आहे. यामध्ये होत असलेली कामे अत्यंत उत्कृष्ट असून हे उद्यान नागरिक व लहान मुले यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानास भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, महानगरपालिका समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका सौ. अनारकली, शेखर इनामदार, संजय कांबळे, संदेश भंडारे यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्यान विकसीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली व या कामासाठी त्यांच्या फंडातून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.‍

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सि. स. नं २६८/१ सांगली या ओपनस्पेसमध्ये उद्यान विकसीत करण्यात येत असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ३२ हजार चौ. फुट आहे. या कामाकरीता अंदाजपत्रकीय रक्कम ७ कोटी २१ लाख इतकी असून या उद्यानामध्ये तिन्ही बाजूने व मध्यभागामध्ये २.७ मीटर रूंदीचे वॉकींग ट्रकसुमारे १२ मीटर उंचीचा क्रांतीस्तंभमहामानवांचे अर्धपुतळेतसेच ध्यान मंदीरविहार हाऊस व ओपन थिएटरस्वागत कमानी इत्यादी कामांचा समावेश आहे.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी महापौर विवेक कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *