दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
पुणे, दि. ०७ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं असून अध्यात्माला सेवाकार्याची जोड देऊन मानवकल्याणाचा आदर्श निर्माण करणारं कृतिशील व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय उपचार, रुग्णसेवा, जलसंवर्धन, निसर्गसंवर्धन, ग्रामविकास, आपत्तीनिवारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी सेवाकार्याचा डोंगर उभा केलं. अशोकराव गोडसे पुण्याचं सांस्कृतिक वैभव होतं. त्यांचं निधन राज्याच्या अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.