देगलूर प्रतिनिधी,दि. ०९ डिसेंबर : देगलूर शहरातील वक्फ बोर्डाच्या मालकीची जमीन परस्पर बेकायदेशीररित्या विक्री करणारे आणि खरेदी करणाऱ्या एकूण आठ जणांविरुद्ध फसवणूक व अन्य कलमानुसार पोलीस स्टेशन देगलूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूककीतील एकूण रक्कम ३४ लाख ७५ हजार रुपये आहे.
प्रभारी जिल्हा वन अधिकारी मोहम्मद रियाजुद्दीन मोहम्मद ग्यासुद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर येथील व संस्था दर्गा हजरत जियाउद्दीन रफाई रहे या संस्थेकडे असलेली सर्वे नंबर ८१ नवीन गट नंबर २९१ मालमत्ता स्वतःची आहे असे दाखवून भासवून परस्पर बेकायदेशीर रीत्या वक्फ मंडळाची कोणतीही परवानगी न घेता सय्यद जियाउद्दिन सय्यद खाजा मोहिनुद्दीन उर्फ नजीब साब या व्यक्तीने इतर आठ व्यक्तींना सौदा चिठ्ठी ठरव पत्र कलमा खरेदी खत तयार करून ही जमीन आठ जणांना परस्पर विक्री केली आहे खरेदी करणाऱ्यांची नावे सय्यद जियाउद्दिन सय्यद खाजा मोहिनुद्दीन नबीसाब राहणार दर्ग्याजवळ देगलूर हैदरसाब चौधरी राहणार देगलूर खैरूनिम्मा बेगम इनामदार राहणार देगलूर मिर्झा अहमद बेग देशमुख राहणार भायगाव मिर्झा मुजाहेद बेग पिता कुदरत बेग देशमुख राहणार भायगाव मिर्झा इम्रान बेग मिर्झा खाजा बेग राहणार देगलूर आजमत बेगम कुदरत बेग देशमुख राहणार देगलूर. मोहम्मद नाजिम पिता मोहम्मद कासिम शाह. देगलूर यांच्याविरोधात पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५५६/ २१ कलम ४६५ ४६८ ४७१ ४२० ३४ सुधारित वक्फ अधिनियम १९९५ चे ५२ a नुसार गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन मच्छरे यांच्याकडे आहे.