वर्धा, दि. 13 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पुलगाव व हिवरा (हा) येथील वसतीगृहांचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास आ. रणजित कांबळे सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते. पुलगाव येथील हरिराम नगर येथे ७ कोटी ४६ लक्ष रुपये खर्च करुन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह बांधण्यात आले आहे. तसेच हिवरा (हा) येथे सुध्दा ७ कोटी ४६ लक्ष रुपये खर्चाचे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह निर्माण करण्यात आले आहे.
पालकमंत्री सुनील केदार यांनी हरिराम नगर येथे बांधण्यात आलेल्या सुसज्य अशा वसतिगृह इमारतीची पाहणी केली. तसेच फित कापून वसतिगृहाचे लोकार्पण केले. पुलगाव व हिवरा येथे बांधण्यात आलेले वसतिगृह प्रत्येकी ७५ विद्यार्थी क्षमतेचे आहे. पालकमंत्री श्री. केदार व आ. रणजीत कांबळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक उपायुक्त श्री. गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री. कुळकर्णी यांनी केले.