‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत

मुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. २८, बुधवार दि. २९ आणि गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पर्यटन विभागाच्या कामकाजावर आधारित ही मुलाखत घेण्यात आली आहे. ‘माझी वसुंधरा’ हे अभियान, या अभियानाचे स्वरूप, ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्याचा करण्यात आलेला गौरव, पर्यावरण व हवामान बदल रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग, कृषी पर्यटन, कॅरॅव्हॅन व कॅम्परव्हॅन ही नवीन संकल्पना, मुंबईचा पर्यटनदृष्ट्या विकास आदी विषयांची माहिती श्री. ठाकरे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *