पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ डिसेंबर रोजी कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार

नवी दिल्ली प्रतिनिधी , दि.२७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी  २८ डिसेंबरला ( मंगळवारी)  कानपूरला भेट देणार असून दुपारी दीड वाजता, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाइन प्रकल्पाचेही उद्घाटन करणार आहेत. त्याआधी, सकाळी ११ वाजता, पंतप्रधान आयआयटी कानपूरच्या ५४ व्या दीक्षांत समारंभात देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

नागरी भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि अधिक बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कायम भर असतो. कानपूर मेट्रो रेल्वेच्या या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने उचललेले हे आणखी एक पाऊल आहे. मेट्रोचा पूर्ण झालेला टप्पा आयआयटी कानपूर ते मोती झील पर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे निरीक्षण देखील करणार असून, आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर या भागात मेट्रोने प्रवासही करणार आहेत. या संपूर्ण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची लांबी ३२ किलोमीटर असून या प्रकल्पासाठी ११००० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *