किनवट प्रतिनिधी.सी.एस.कांगणे
दि.१३जानेवारी २०२२ :- अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे शहराध्यक्ष सलाम अब्दुल रहमान हे स्वतः दोन्ही पायाने दिव्यांग असून विस्थापित झालेल्या कुटुंबासह त्यांनी आजपर्यंत न्याय मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न सामूहिक रीत्या केले होते परंतु विस्थापित झालेल्या कुटुंबामध्ये एक मत नसल्याने शहराध्यक्ष सलाम अब्दुल रहमान यांनी संघटनेचे सचिव राज माहुरकर यांच्याकडे न्याय मिळून देण्याबाबत विनंती केल्यानुसार सदर निवेदन देऊन उपोषणास बसणार आहे गांधीनगर येथील २५ कुटुंबांना अतिक्रमित घोषित करून नगरपरिषदेने कोणताच सक्षम आदेश नसताना बळाचा वापर करून गांधिनगर वासियांना विस्थापित केले असल्याचे चर्चा शहरात जोर धरत आहे विस्थापित झालेले कुटुंब योग्य पद्धतीने शासन प्रशासनाकडे आंदोलन करत नसल्याने सलाम अब्दुल रहमान यांनी संघटनेच्यावतीने न्याय मिळवण्यासाठी १०/०१/२०२२ रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्याकडे निवेदन सादर करून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार किनवट, मुख्याधिकारी नगर परिषद किनवट व पोलिस ठाणे यांना दिले आहे निवेदनात त्यांनी मूलभूत सुविधेसह पुनर्वसनाची मागणी करत नगर परिषद हद्दीतील जागेवर पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा २५/०१/२०२२ पासून कुटुंबासह आमरण उपोषणास बसणार आहेत