हवामान विभागाचा ऑरेंज इशारा
हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले की मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो.
याप्रसंगी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी देखील माहिती दिली.
बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील मार्गदर्शन केले व यंत्रणांनी अधिक समन्वय ठेवावाव असे सांगितले. , मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव असीम गुप्ता, मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, सर्व पालिका उपायुक्त उपस्थित होते.