हणेगाव प्रतिनिधी,दि.०५/०२/२२ :- हाणेगाव येथील सन्माननीय डॉक्टर सूर्यकांतजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उदयगिरि लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर,व डॉक्टर असोशियन यांच्यावतीने हाणेगाव तालुका देगलुर येथे दिनांक ०७/०२/२०२२ सोमवार रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, हणेगाव येथील अत्यंत लोकप्रिय डॉक्टर सूर्यकांत नाईक जे नेहमी गोरगरिबांच्या हाकेला ओ देतात प्रसंगी रुग्णांवर मोफत उपचार करतात इतकेच नव्हे तर रुग्णाच्या पाल्यावर शिक्षणासाठी व इतर गरजेसाठी देखील आर्थिक मदत करून रूग्णाला धीर देतात.कोरोना काळात स्वतःचा जीव मुठीत ठेवून रुग्णाच्या जीवासाठी धडपडणारे इतरांसाठी आदर्श असणारे शांत मनमिळावू आरोग्यासाठी नेहमी अग्रेसर आतापर्यंत विविध उपक्रम घेऊन झटणारे डॉक्टर सूर्यकांतजी नाईक. यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू शिबिरास जास्तीत जास्त रुग्णांनी हजेरी लावून लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर असोशियन हणेगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.