नायगाव प्रतिनिधी :मांजरम येथील ग्रामविकास अधिकारी टी.जी.रातोळीकर हे गावांमध्ये महिनाभरात फक्त चार ते पाच वेळा आणि कधी येतात कधी जातात त्यांनाच माहीत असते.गावामधील सर्व सामान्य जनता ही त्यांना भेटण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये फेरफटका मारून कंटाळत आहेत.त्यांच्या ह्या मनमाणी कारभारामुळे मांजरम हे गाव विकासापासून कोसे दुर गेले आहे.गावात घाणीचे साम्राज्य वाढले आहे नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत.गावातील मुख्य रस्त्यावर नाल्यांचे पाणी येत आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांना व नागरिकांना देखील रस्त्यावरून चालत असताना कसरत करावी लागत आहे.गावात मुख्य ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत व गावात स्वच्छतेचे तर बारा वाजले आहेत.गावातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये घरकुल योजनेचे आहेत,निराधारांचे असतील, संडासचे असतील,अपंगांचे ३% असतील व असे अनेक प्रश्न आहेत.टी.जी.रातोळीकर यांना स्मशानभूमीतील स्वच्छता करण्यासाठी विनंती केली होती निवेदनाद्वारे त्यांनी त्या निवेदनाला देखील केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांसाठी ग्रामविकास अधिकारी हे शोभेची वस्तुच म्हणावी लागेल असेही शिंदे यांनी म्हटले आहे.