रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.

रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.

मुखेड प्रतिनिधी ,दि.१३ :-
मुखेड तालुक्यातील उंद्री(प.दे) येथे शेतात रब्बी हंगामातील पिक राखण करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले.ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.मोतीराम काशिराम शिंदे असे जखमी शेतकऱ्यांचे नाव असून त्यांना पुढील उपचारासाठी देगलूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे.शेतातील पिक नष्ट करणे,शेतकऱ्यावर हल्ला करणे,अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *