देगलूर प्रतिनिधी , दि.२१ :- तालुक्यातील शान गंगाप्रसाद मुदिराज देगलूर शहरात आले असता त्यांचा सत्कार वर्गमित्र बंधू तुल्य इश्वर देशमुख यांच्या राहत्या घरी सत्कार करण्यात आलाअसून त्यांनी जोडलेली मित्रत्वाची नाळ आतापर्यंत कायम राहील या कारणामुळे संपूर्ण देगलूर तालुक्यात त्यांचा चांगलाच चाहता वर्ग आहे.
सविस्तर २००८ यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपअधीक्षक पदी यांची निवड झाली नाशिक अकॅडमी प्रशिक्षण पूर्ण करून, त्यांनी पहिली पोस्टिंग विलेपार्ले मुंबई येथे जॉईन केली. तसेच २०१३ ला मुंबई लेंडर क्राइम ब्रांच सहाय्यक पद दिली गेली त्यानंतर त्याने अनेक गुन्ह्यांचा निर्भीडपणे पडदा उठवत कामगिरी बजावल्यामुळे फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देऊन त्यांना तेथील इन्चार्ज करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ७६ बक्षिसे मिळवलेले आहेत. विशेष म्हणजे माननीय पोलिस आयुक्त यांच्यातर्फे दोन वेळेस सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपला कामाचा कायमचा दबदबा गंगाप्रसाद मुदीराज ठेवून आहेत.
मूळ गावी देगलूर शहरात आले असता मित्रासह १९ फेब्रुवारी २०२२ रोजी ईश्वर देशमुख यांनी बुद्धभूषण पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष ईश्वर देशमुख उपाध्याय बालाजी पा. पांचारे देगलूर तालुका सोशल मीडिया प्रमुख शहाजी वरखिंडे पाटील महासंघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
पुढील कारकीर्दीस पोलीस निरीक्षक गंगाप्रसाद मुदीराज यांना शुभेच्छा.