मुखेड प्रतिनिधी~ज्ञानेश्वर कागणे
मुखेड दि , ०१ :- आज मौजे हिब्बट येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
आज सर्व देशात महाशिवरात्री ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू धर्मात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो .
अशा या पावन महीन्यात मुखेड तालुक्यातील हिब्बट गावात शिवलीलामृत ग्रंथाचे दररोज प्रवचन करण्यात आले तर आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे गावकऱ्यांनी आयोजन कले तर सायंकाळी सुप्रसिद्ध हास्य संम्राट किर्तनकार ह.भ.प.श्री गणेश महाराज धुगे आळंदी देवाची यांचे व बाल गायक,बाल पकवाज वाजक,आळंदी देवाची यांचे भव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते
या धार्मिक कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला