मुखेड उपजिल्हा रुग्णालयातुन दुचाकी वाहन चोरी.

 

मुखेड :- प्रतिनिधी  ज्ञानेश्वर कागणे

दि.०६ मार्च,:- मुखेड उपजिल्हा रुग्णालयातुन दुचाकी वाहन चोरट्यांनी पळवली पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहिती वरुन दिनांक ०२.जुन २०२१ रोजी दुपारी १२.३० ते ०१.०० वाजेच्या दरम्यान, उप जिल्हा रुग्णालय गेट मध्ये उभी केलेली दुचाकी वाहन फॅशन प्रो. कंपनीची क्रमांक एमएच -२६ / एफ / ८०३७  ३०,००० /- रुपयाची दुचाकी वाहन उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट मध्ये लावली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. असल्याची फिर्यादी संदीप भारत पवार, वय २५ वर्षे, रा. दापका राजा ता. मुखेड जि. नांदेड यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मुखेड येथे गुन्हा रजिस्टर, नंबर १६२/२०२२ कलम ३७९ भादवी कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असुन या बाबत अधिक तपास पोना / १४०२ महेंद्रकर,  हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *