मुंबई दि ११ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त का दि.१० मार्च रोजी विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत तसेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.