मदनुर प्रतिनिधी , दोंतुलवार सोपान मरखेलकर( मदनुर ) दि.१७ :- मदनुर सरकारी दवाखाना परिसरात वाळलेल्या गवतास अचानक आग लागुन संरक्षक भिंतीचे भारी नुकसान झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मदनुर सरकारी दवाखाना परिसरात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व निष्काळजीपणामुळे जास्तीत जास्त गवत वाढले आहे व ह्या उष्ण वातावरणा मुळे सर्व गवत वाळून गेल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बीडी ओढुन फेकुन दिल्या मुळे आज दुपारी अचानक आग लागल्या मुळे कंपाउन्ड चे भारी नुकसान झाल्याचे वृत्त समजले आहे.
अचानक पेट घेतलेल्या गवतामुळे रुग्णांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला यावेळी मदनुर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी येवून अगीपासुन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापासुन रोखण्यात यशस्वी झाले अग्नी शमन दलाचे सर्व कर्मचारी उपस्थित राहुन आग आटोक्यात आणण्यास जे परिश्रम घेतले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुदैवाने यात कोणतेही जिवीत हानी झाली नाही असे अग्नी शमन दलाचे कर्मचारी नरसींग मदनुरकर यानी ही माहीती दिली आहे .