निवेदन देऊन दोषीवर कार्यवाही न झाल्यास उपोषनास बसण्याचा ईशारा.
देगलूर प्रतिनिधी, दि.२०मार्च :- देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हल्ली फारच गोंधळ सुरू आहे असे चित्र दिसत आहे. कोविड १९ च्या नंतरच्या काळात तर आधिकारी व स्टाफ यांच्यात काही तारतम्य नसल्याचे चित्र आहे रुग्णांना कसल्याही प्रकारची सुविधा येथे मिळत नाही, रुग्णांना नेहमीच बाहेरून गोळ्या – औषधी आणाव्यास लागतात तपासणी देखील बाहेरूनच करावी लागते.
या बाबत सविस्तर वृत असे की देगलूरचे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे “असून अडचण नसून खोळंबा” असे झाले आहे. जर एखादा ग्रामीण भागातला रुग्ण दवाखान्यात आला तर त्या रुग्णाला तेथील कर्मचारी व डॉक्टराचा सेवाभाव नष्ट होऊन त्यांच्यातला व्यापारी जागा होतो असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही त्या रुग्णाला सेवा देण्या ऐवजी त्याच्याकडून किती मेवा मिळतो फक्त ऐवढेच गणित येथील डॉक्टर व कर्मचारी घालतात मग तो गरीब असो, लाचार असो, गरोदर स्त्री असो,किंवा अन्य कोणी रुग्णाला उर्मट बोलणे, त्यांना वेळेवर उपचार न देणे, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईक यांना नाश्ता, जेवण. न देणे खाजगी रुग्णालयात पाठवणे, सरकारी सुविधा न देता वरिष्ट अधिकाऱ्याला किंवा ठेकेदारला हाताशी धरून त्याचे पैसे आपल्या घश्यात घालणे असे प्रकार रासरोज सुरू असल्याचे दिसून येत आहेत .
या बाबत सखोल चौकशी होऊन दोषीवर कार्यवाही व्हावी म्हणून, व वरिष्ट आधिकाऱ्याच्या निदर्शनास या गोष्टी दाखवून द्याव्या म्हणून देगलूर येथील सा. महिमा खादीचा या वृतपत्राचे संपादक गजानन बीडकर यांनी दि. ०७/०२/२०२२ रोजी माहितीच्या अधिकारातून रुग्णालयातील काही माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता सदर अर्ज केल्या नंतर दि. ०७/०३/२०२२ रोजी रुग्णालयातील कर्मचारी श्री बळिराम शेळके यांनी संबंधित अर्जात असलेल्या मुद्यावरील अर्धवट माहिती अर्जदारास देत होते, ही माहिती अपूर्ण असल्याचे सांगून मला संपूर्ण द्या असे अर्ज दराने सांगितले त्यावर वैद्यकीय अधीक्षक याच्याशीही अर्जदारने संवाद साधला असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेली असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे .
सदर बाबतीत निवेदन देऊन दोषीवर कार्यवाही न झाल्यास उपोषनास बसण्याचाही ईशाराही यावेळी देण्यात आला आहे . बातमीवर लक्ष लागून आहे .