बालगृहातील रूद्रा वानखेडेचा वाढदिवस महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून साजरा

अमरावती प्रतिनिधी , दि. २०  : दर्यापूर येथील संत गाडगे महाराज बालगृहात रूद्रा वानखेडेचा वाढदिवस आज संस्थेच्या अध्यक्षा आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यामाध्यमातून मोठया थाटात साजरा करण्यात आला.

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस असतो. या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाईकांनी विशेषतः आई-वडिलांनी आपले लाड करावेत, कौतुक करावं आणि हा आनंद शतगुणित व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. अमरावतीमधील बनोसा दर्यापूर येथे संत गाडगेबाबा मिशन मुंबई द्वारा संचालित संत गाडगे महाराज बालगृह चालवले जाते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या स्वत: संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्या आज अमरावती विभागाच्या दौऱ्यावर असताना आपल्या संस्थेच्या बालगृहातील एक चिमुकला रुद्रा योगेश वानखेडे याचा वाढदिवस असल्याची त्यांना माहिती मिळाली. सदर माहीती मिळताच ॲड. ठाकूर यांनी त्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपला ताफा संत गाडगे महाराज बालगृहाकडे वळविला. यानंतर सर्वांच्या उपस्थितीत रुद्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी रुद्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या.

यावेळी रुद्राच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याच्या आयुष्यात आनंदाचे असे क्षण पेरता आले, याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या रूद्रासारख्याच अनेकांचं पालकत्व गाडगेबाबा मिशनने घेतलंय, त्यामुळे ही मूलं आपली जबाबदारी असल्याचं असल्याचे त्या म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *