मुंबई, दि. २३ : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करावेत, असे मुंबई येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ मार्चपर्यंत २०२२ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.