जत शहरामधील रस्त्यांची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

मुंबई, दि. २३ : सांगली जिल्ह्यातील जत शहरातील रस्त्यांची कामे सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य  विक्रमसिंह सावंत यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील जत  शहरातील एक कि.मी लांबीमध्ये काँक्रिट रस्ता व गटरपर्यंत पेव्हींग ब्लॉकच्या बाजूपट्टीचे काम ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे. रस्ता वाहतुकीस सुस्थितीत असून या ठिकाणच्या २० मीटर लांबीतील गटरचे काम वगळता ९८० मीटर लांबीतील गटरचे काम पूर्ण झाले आहे. ही कामे सप्टेंबर २०२२ अखेर पूर्ण होतील असे नियोजन करण्यात  आले असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *