मुंबई, दि. २४ :- शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल येथे क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या वीरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.
‘भारतमातेच्या या थोर सुपुत्रांनी मातृभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सर्वस्वाची होळी केली. त्यांचा त्याग, समर्पण अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांचे जीवन हेच राष्ट्रभक्तीचा महान संदेश आहे. हा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी सदैव जागरूक राहूया’, असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे