फायनान्स कंपनीचे वसुलीदार नागरिकांना त्रास देत असल्याच्या दाखल तक्रारींचा तपास जलद गतीने करणार – गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई

मुंबई, दि. २५  : फायनान्स कंपनीचे वसुलीदार नागरिकांना त्रास देत असल्याच्या दाखल तक्रारींचा तपास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य  माधुरी मिसाळ यांनी पुणे शहरात फायनान्स कंपन्यांचे वसुलीदार नागरिकांना धमकावित असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सुनिल प्रभू, प्रकाश आबिटकर यांनी भाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, पुणे शहरात सायबर पोलीस स्टेशन पुणे अंतर्गत ५५८ तक्रार अर्ज प्राप्त आहेत. त्यापैकी ५२ अर्ज संबधित पोलीस स्टेशनकडे चौकशीकरिता पाठविले आहेत.

याबाबतच्या वसुली एजंटच्या गैरवर्तणुकीसंदर्भात या तक्रारींचा तपास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल तसेच अशा काही तक्रारी असल्यास  नागरिकांनी पोलीस ठाण्यांमध्ये दिल्यास रितसर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती अशी माहिती राज्यमंत्री श्री. देसाई यांनी विधानसभेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *