मुंबई, दि. २५ : औसा व निलंगा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड प्रस्तावाबाबत कृषीमंत्री व रोजगार हमी मंत्री यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड प्रलंबित प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, औसा व निलंगा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड प्रस्तावाबाबत कृषिमंत्री व रोजगार हमी मंत्री यांना याबाबत माहिती देऊन या विषयी सर्वांची बैठक घेऊन या बैठकीत याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी विधानसभेत दिली.