पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि मुसळधार पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्रातील काही भागात उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केलीएका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि मुसळधार पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्रातील काही भागात उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे. @OfficeofUT”