कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी १२ एप्रिलला सुट्टी जाहीर

कोल्हापूर , दि. २९  : भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने कोल्हापूर मतदारसंघात दिनांक १२  एप्रिल २०२२  रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडे सोपविलेल्या अधिकाराचा वापर करून मंगळवार, दि. १२  एप्रिल २०२२  रोजी २७६ -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असेल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी राजपत्राद्वारे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *