ठाणे, दि. ०५ : अनेक उत्तराखंड वासीय आणि परराज्यातून आलेले अनेक नागरिक महाराष्ट्रात स्वाभिमानाने व सन्मानाने आपलं घर मानून राहतात, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
काफल फौंडेशनच्या वतीने बेलापूर येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित उत्तराखंड प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार गणेश नाईक, देवभूमी स्पोर्ट्स फौंडेशनचे (डीएसएफ)अध्यक्ष सुरेश राणा, उत्तराखंड मित्र मंडळाचे अध्यक्ष माधवानंद भट्ट, आदि उपस्थित होते.
श्री. कोश्यारी म्हणाले की, मराठी भाषेतील अनेक शब्द हे गढवाली भाषेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी, ग्रामीण भागात गेल्यानंतर मला आपल्या गावात गेल्यासारखं वाटते.
यावेळी श्री. नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रीमियर लीगच्या विजेत्यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.