‘दवाखान्यात रुग्ण त्रस्त डॉक्टर मस्त’ असे हाल.
देगलूर प्रतिनिधी,दि. १२ एप्रिल ;- देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ च्या नंतर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे हा दवाखाना म्हणजे शासनाच्या नियमाचे पालन करण्याचा नसून सरकारने यांच्या बापाची मक्तेदारी ठेवले आहे की काय? असे काही डॉक्टर वागत आहेत. काही खाजगी लोकांना हाताशी धरून कंत्राटी जुन्या आशा वर्करला हाताशी धरून शेजारी प्रांतातील रुग्णाला पिळून खात आहेत.
या बाबत सखोल चौकशी केली असता देगलूरच्या रुग्णालयात कोविड १९ च्या नंतर कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून, शेजारी राज्यात ह्या शस्त्रक्रिया अजून चालू झाल्या नाहीत. महामारीच्या नंतर वाढलेल्या महागाईमुळे कुटुंब चालवणे अवघड झाल्यामुळे गरीब कुटुंबे कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी धडपडत आहेत. व त्यांच्या राज्यात ते शक्य नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने महाराष्ट्रातील देगलूरच्या रुग्णालयात यावे लागत आहे. पन काही आसुरी वृत्तीचे डॉक्टर याचाच फायदा घेत रुग्णाकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी ५००० ते २०००० पर्यंत पैशेची मागणी करत आहेत. खाजगी व्यक्तीकरवी ही रक्कम आपल्या घश्यात घालत आहेत व रुग्णाच्या नातेवाईकांना कुणाला न सांगण्याची चेतावणी देत आहेत. आपला रुग्ण त्यांच्या ताब्यात असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक गपगुमान पैसे देऊन हा त्रास सहन करत आहेत असे खात्री लायक वृत आहे.
पाच अंकी पगार असलेल्या अश्या ‘डॉक्टरासुरला’ कोण लगाम घालेल अशी चर्चा आता सुरू आहे.ही फारच खेदाची बाब असून इतके मोठे षडयंत्र करणाऱ्या या डॉक्टरचे रहस्य रुग्णालयातील इतर कर्मचारी व सभ्य डॉक्टराला माहीतच नसेल का? अशी कुजबुजही रुग्णात सुरू आहे. यातून हा देखील प्रश्न पडत आहे की इतर स्वाभिमानी डॉक्टरांनी व कर्मच्याऱ्यांनी आपला स्वाभिमान हरवला का?. अश्या प्रकारच्या घटनावर अंकुश घालण्यासाठी कोण पुढाकार घेणार यावर लक्ष लागून आहे. व अश्या पीडित रुग्णाला सा. महिमा खादीचा या वृतपत्रा द्वारे आवाहन करण्यात येते की अश्या डॉक्टरा विरुद्ध आवाज उठवावा व शासनाने ठरवून दिलेल्या दरा व्यतरिक्त एक नवा पैसही कोणत्याही कर्मचारी किंवा डॉक्टरला देवू नये. जेणे करून भ्रष्टाचाराला आळा बसेल.