भारत सरकारची ई संजीवनी ही राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. ८० लाख दूरध्वनी-सल्ला मसलती पूर्ण करून त्याने आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. सध्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा ३५ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि दररोज देशभरातील ६० हजारांहून अधिक रूग्ण राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील शासकीय आरोग्य सेवा यंत्रणेकडून आरोग्य सेवा मिळवण्यासाठी याचा वापर करत आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेली नॅशनल टेलीमेडिसिन सेवा दोन टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मद्वारे दोन प्रकारची टेलि-मेडिसिन सेवा प्रदान करत आहे. ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी (डॉक्टर-डॉक्टर टेलिकन्सलटेशनसाठी) हब आणि स्पोक मॉडेलवर आधारित आहे आणि ईसंजीवनीओपीडी (रूग्ण – डॉक्टर टेलिकन्सलटेशन) नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये बाह्यरुग्ण सेवा प्रदान करते.
नोव्हेंबर २०१९ मध्ये, केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. डिसेंबर २०२२ पर्यंत देशातील १,५५,००० आरोग्य व कल्याण केंद्रांवर ती कार्यरत होईल. त्याची अंमलबजावणी झाल्यापासून, ई-संजीवनीएबी-एचडब्ल्यूसी सुमारे २५०००आरोग्य व कल्याण केंद्रावर कार्यरत आहे आणि वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह सुमारे २००० केंद्रांवर ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीने सुमारे ३९ लाख कन्सलटेशन पूर्ण केल्या आहेत.