देगलूर प्रतिनिधी,दि.२१
देगलूर शहरात आणि तालुक्यात चालू असणान्या जुगार, मटका आणि सट्टे बाजार यांवर कार्यवाही करणे, देगलूर शहरात क्रीडा संकुलाच्या बाजूच्या शेतात आणि नागराळ येथील शेतात चालू असणाऱ्या जुगार अड्डा, शहरात तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी जोरात चालू असणारा मटका आणि सध्या चालू असलेल्या IPL सामान्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टे बाजार जोरात चालू आहे. हा सर्व गैरव्यवसाय सर्रास आणि एवढ्या बिनदिक्कत पणे सुरू आहे की, परिसरातील सामान्य नागरिकांकडून प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या सर्व प्रकारात प्रशासन का कानाडोळा करत असेल?
या सर्व बाबी फार गंभीर आहेत, यात अनेक तरुण अडकत चालले आहेत आणि हे असेच चालू राहिले तर अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद होईल आणि कित्येक संसाराची राखरांगोळी होऊन त्यांचे कुटुंब रस्त्यावर येईल. यास्तव हा गैरप्रकार वेळेत कायदेशीर कडक कारवाई करून बंद करावे असे, असे निवेदन देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख दिगंबर रमेशराव कौरवार यांनी पोलीस स्टेशन देगलूर येथे दिली व देगलूर परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे. लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष घालून देगलूर शहरवासीयांना न्याय द्यावा.