साहित्य संमेलनात शासनाच्या द्विवर्षपूर्ती प्रदर्शनाचे भव्य आयोजन; राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर,दि. २४ : महाविकास आघाडी शासनाच्या दोन वर्षपूर्तीवर आधारित विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या दृष्टीने चित्रमय आणि मजकूर रूपातील अत्यंत प्रभावी प्रदर्शन असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोना काळात संपूर्ण देश बंद होता, पण शासन मूलभूत गोष्टींसह विकासकामावरही काम करत होते हे या प्रदर्शन पहिल्यानंतर जाणवते अशी भावना माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी प्रदर्शन पहिल्यानंतर व्यक्त केली.
संमेलनात सहभागी नागरिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देत शासनाच्या कल्याणकारी योजनांची सचित्र माहिती जाणून घेत आहेत.
या प्रदर्शनात मूलभूत सोयीसह राज्यात सुरु केलेले प्रकल्प त्यांच्या माहितीसह सचित्र असल्यामुळे अधिकाधिक लोक या प्रदर्शन पाहिला येत आहेत. या प्रदर्शनात कृषी विकासाला मिळतेय बळ. चिंतामुक्त शेतकरी, कर्जमुक्त शेतकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर चैत्यभूमी स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय, मुंबईत मराठी भाषा भवन उभे राहणार, आर्थिक शक्ती केंद्र मानाचे, देशात नाव महाराष्ट्राचे… दोन वर्षात ४ लाख कोटीच्यावर गुंतवणूक यासह महत्त्वाच्या योजनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.