किनवट येथे वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

 

किनवट प्रतिनिधी, सी.एस.कागणे दि. ०९  :- किनवट येथे वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडल्याचे प्रकरण उजेडात आले असून शरयू हॉस्पिटलचे डॉक्टर विकास सुंकूरवार यांनी कामासाठी ठेवलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत तब्बल बारा वेळेस बळजबरी संभोग केल्याने सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि दिनांक ६/५/२०२२ रोजी तिचा गर्भपात करण्यात आला. याबद्दलची तक्रार सदर पीडित मुलीने किनवट पोलीस स्टेशनला दिली आहे.

त्यावर ३७६,(२)(१) (एन) ५०६ सहकलम ४,६,पोक्सो अँक्ट प्रमाणे सदर डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला.या खळबळजनक घटनेची तपशीलवार माहिती अशी की, तक्रारदार मुलगी ही धोबी गल्ली किनवट येथे वास्तव्यास असून गरिबी आणि बिकट परिस्थितीमुळे ती नोव्हेंबर २०१९ पासून ते मार्च २०२२ पर्यंत सदर अल्पवयीन मुलगी डॉक्टर विकास सुंकलवाड यांच्या शरयु हॉस्पिटलमध्ये सफाईगार म्हणून २००० रुपये प्रति महिना पगारी वर कामास होती.

पण त्या असाह्य मुलीवर सदर डॉक्टराची पापी नजर पडली अन त्या नीच डॉक्टरांने सतत दिवस व रात्रीच्या  बारा वेळेस अतिप्रसंग करत संभोग करत आपली कुवासना भागवली. अश्या आपल्या लेखी तक्रारीत मुलीने नमूद केले आहे.

या अशा प्रसंगाला कंटाळून व हा प्रसंग कोणाला सांगशील तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे सदर मुलीने तेथील काम बंद केले. आणि ६,५,२०२२ रोजी तिच्या पोटात वेदना होत होत्या म्हणून तिने डॉक्टर  व  लँब येथे तपासणीसाठी गेली होती

व तेथेच तिचा गर्भपात झाला पण अंदाजे पाच ते सहा महिन्याचा गर्भपात कसा झाला हा प्रश्न पडत असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डॉक्टर पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात व वैद्यकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. देवाचे रूप म्हणून समाजात प्रतिष्ठेने ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरांकडूनच असा नीच काळिमा फासणाऱ्या घटना होत असतील तर विश्वास कुणावर करायचा हा मोठा प्रश्न या वरुन उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *