शिर्डी,दि.१८ मे (उमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री.दीपक कपूर हे आज येथे शिर्डी आले असता त्यांनी उपमाहिती कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय व उप माहिती कार्यालय, शिर्डी कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी महासंचालक श्री.दीपक कपूर यांनी अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय व शिर्डी उप माहिती कार्यालया मार्फत करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी, आस्थापना, सोशल मीडिया व इतर कार्यालयीन कामकाज या विषयांचा आढावा घेतला. समाज माध्यमांच्या विविध शाखांचा प्रभावीपणे वापर करून शासनाच्या विकासात्मक कामांना प्रसिद्धी द्यावी. असा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर यांनी बैठकीपूर्वी स्वागत केले. यावेळी उप माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी श्री.सुरेश पाटील, छायाचित्रकार सुनिलदत्त शिवदे, सिनेयंत्रचालक धनंजय जगताप, लिपिक प्रविण पाटील ,प्रविण मुठे, नागेश निकम उपस्थित होते.