बेरोजगारांना उद्योजकाचे स्वप्न साकारण्यासाठी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षणातून दिशा – महापौर जयश्री पावडे

·     उद्यमिता यात्रेचे नांदेड मध्ये आगमन

·    सामाजिक न्याय भवन येथे प्रशिक्षण

      गरजू व होतकरू लाभार्थ्यांनी घ्यावा        लाभ

नांदेड,  दि. ०३ :- कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अनेकांना रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले. अनेकांचे रोजगार बुडाले. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी व नवा आत्मविश्वास देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही उद्यमिता यात्रा महत्वाची असून या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून शहरी बेरोजगारांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नांदेडच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी व्यक्त केला.

 अनेकांना रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले. अनेकांचे रोजगार बुडाले. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी व नवा आत्मविश्वास देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही उद्यमिता यात्रा महत्वाची असून या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून शहरी बेरोजगारांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नांदेडच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी व्यक्त केला.

स्वयंरोजगार निर्मिती व उद्यमिता नवीन युवा-युवतींमध्ये रुजावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि युथएड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या उद्यमिता यात्रेचे आज नांदेड येथे आगमन झाले. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची उपस्थिती होती.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही उद्यमिता यात्रा जात असून ४० दिवसात ४० प्रशिक्षकांमार्फत ४ हजार  युवक-युवतींपर्यंत पोहोचून त्यांच्या व्यवसायाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नांदेड येथे या यात्रेतील प्रशिक्षकांमार्फत ४ जुन २०२२ पर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील. इच्छुकांनी वेळेच्या आधी या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

उद्यमिता यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण शिबिरात व्यवसायाचे नियोजन, योजनांची माहिती, राज्य शासनाची ओळख, योजनांसाठी असलेल्या अटी, व्यवसायाचे पर्याय, डिजिटल साक्षरता, उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, बीजभांडवल योजना, आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल.

इच्छुकांनी यात सहभाग घेण्यासाठी जिल्हा समन्वयक इरफान खान, शुभम शेवनकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर नांदेड येथे दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *