देगलूर (प्रतिनिधी) दि. ०३ जुन :- याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, “जामा मस्जिद ते पत्रकार भंडरवार यांचे घर व जामा मस्जिद ते अमरदिप हॉटेल” पर्यंत चे ड्रेनेजचे अपुर्ण काम तात्काळ पूर्ण करून लोकांना सुख सुविधायुक्त जीवन जगता यावे यासंदर्भात दि.१९/०५/२०२२ रोजी नगर परिषदेला निवेदन दिले होते.
या निवेदनाला चक्क केराची टोपली दाखवत नगरपरिषदेने आपली मनमानी चालवण्याचा प्रकार दाखविला आहे. रस्त्याचे खोदकाम करून तर टाकले मात्र त्यांची दुरुस्ती अपुरी राहिली असल्याने नागरिक अधिक त्रस्त झाली आहेत. खास करून दुचाकीस्वारांना याचा जास्त त्रास होत आहे . त्यात अधिकची भर टाकली ती म्हणजे रस्त्यावर जमा होत असलेल्या कचऱ्याने. नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचे मूलभूत हक्क घटनेने दिलेले आहे. आणि या घटनेचे पालन करणे प्रशासनाचे आद्यकर्तव्य असतानासुद्धा देगलूर नगरपरिषदेने मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रेनेज वर खर्च करून सुद्धा लगेचच ड्रेनेज लाईनला गळती होऊन त्यातून घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने सबंध कामाची चौकशी सुद्धा तात्काळ करण्यात यावी. अशीही मागणी सबंध नागरिकांत वाढत आहे. देगलुर नगरपरिषदेच्या ढिसाळ कामगिरीवर जनता कमालीची नाराज आहे. देगलूर नगरपरिषद अंतर्गत ड्रेनेजचे काम पूर्ण करण्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन सुद्धा काही ठिकाणी कामे झालीच नाही. तर काही ठिकाणी अशी अपुरी असल्याकारणाने नाराजीचा सुर वाढत आहे. शिवाय तात्काळ हे अपुरे ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले गेले नाही तर नगरपरिषदेच्या समोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान यांनी म्हटले होते. मात्र कसलेही काम केले नसल्याने दि. १८/०६/२०२२ रोजी देगलूर नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.