नांदेड जिल्ह्यात काल एक व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड, दि. ८ :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या १३९ अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  १ अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या १ लाख २ हजार ८०४ एवढी झाली असून यातील १ लाख १०९ रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ३ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६९२ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण १ असे एकुण १ कोरोना बाधित आढळला आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण १, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात २ असे एकुण ३ व्यक्ती उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *