नांदेड, दि. ८ :- केंद्रपुरस्कृत अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळा व मदरसामध्ये शिक्षण योजना एसपीक्यूईएमएम व आयडीएमआय या योजना येतात. या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळांसाठी पायाभूत विकास योजना व मदरसातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आर्थिक तरतूद मागणीचे प्रस्ताव गुरुवार ३० जून २०२२ पर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद नांदेड कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.