नांदेड प्रतिनिधी,दि.१० :- गीतानगर भागातील ज्येष्ठ महिला सेवानिवृत्त शिक्षिका नंदाताई रत्नाकर चौधरी (वय ६४) यांचे सोमवारी (ता. सहा) रात्री साडेदहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. सात) गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. आयएएस अधिकारी तपस्या चौधरी – कुलकर्णी यांच्या त्या आई होत तर आयएफएस अधिकारी मैत्रेय कुलकर्णी यांच्या त्या सासू होत. नंदाताई चौधरी या आदर्श शिक्षिका होत्या तसेच त्या समाजसेविकाही होत्या. त्यांनी गोरगरिब आणि गरजू मुलांसाठी निवासी वसतीगृह सुरू केले त्याचबरोबर तपस्या अभ्यासिकाही त्यांनी सुरू केली होती. त्याचा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक होतकरू मुलांना फायदा झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊन विविध पदांवर कार्यरत आहेत.