नांदेड, दि. ०९ :- राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांनी दिलेल्या आदेशान्वये दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषदाच्या अंतिम प्रभाग रचना व नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सुधारीत प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदाच्या अंतिम प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच हे नकाशे संबंधित नगरपरिषद कार्यालयात आज ०९जून २०२२ रोजी पाहवयास उपलब्ध आहेत, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.