नांदेड दि. ०९ :- देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन २०१४-१५ पासून सुरु करण्यात आली.
आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत २ लाख ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. विवाहाचा एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड कार्यालयास प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी केले आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
विहित नमुन्यात अर्ज, पासपोर्ट फोटो, विवाह प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला टी.सी., उत्पन्न प्रमाणपत्र (मर्यादा रुपये ५ लाखाच्या आत), आधार कार्ड, पॅन कार्ड, पती पत्नीच्या नावाने संयुक्त बँक खाते क्रमांक, जिल्ह्यातील खासदाराचे शिफारस प्रमाणपत्र इत्यादी.