देगलूर प्रतिनिधी, दि.२२ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ. वैशाली ताई मोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आगामी निवडणूक व मोर्चे बांधणीवर प्रमुख्याने यात चर्चा करण्यात आली.महिलानी रोटी आणि बेटी इतकंच सीमित न रहाता सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे येऊन काम करण्याचा सल्ला महिलाना दिला.
समाजातील अंधश्रद्धा हाणून पडण्याचा देखील कान मंत्र या वेळी वैशाली ताई यांनी दिला पुढे बोलताना ते म्हणाल्या की महिलांनी बचत गट अंतर्गत स्वयं व्यवसाय निर्मिती करावी व रोजगारास चालना देण्याचे काम महिलानि द्यावं. समाजातील गरीब होत करू महिलांना मदत सहकार्य कारणांचा देखील सल्ला ताईंनी खूप आदरपूर्वक सांगितला. तसेच अन्य पक्ष्यांच्या व संघटना मजबुतीचे संदेश या वेळी महिला जिल्हा अध्यक्ष सौ.रावनगावकर ताई व वैशाली ताईंनी महिला पदाधिकारी व कार्यकर्तेे यांना दिले.
या वेळी तालुका अध्यक्षा तरकेश्वरी हिंगोले ताई,शहराध्यक्ष मैलागींरे ताई, उज्वला पदमवार ताई, हेमा पवार ताई,जोशी ताई, राजूरकर ताई,स्वामी ताई, जोशी ताई,पवार ताई,कांबळे ताई,कोंडेकर ताई, शाखावार ताई, चव्हाण ताई,उल्लेवार ताई,सोनकांबळे ताई, मैलागींरे ताई,पाटील ताई, देशमुख ताई, फुलारी ताई, महाजन ताई आदि महिला कार्यकर्त्या तसेच जिल्हा उपाध्येक्ष लक्ष्मीकांत पदमवार, तालुका अध्यक्ष अंकुश देसाई, शहर अध्यक्ष असिफ पटेल , संजय चिनमवार,नंदू सेठ शाखावार,माधव फुलारी, अनिल तोताडे, शैलेंद्र चव्हाण,सय्येद मोयोदिन , लालू कोयलावार,अनिल कोंडेकर,पिंटू जोशी, मिलिंद कावळगावकर,गजू भाऊ कांबळे,सुमित कांबळे शशांक पाटील , शिवा डाकोरे,विकास नारबागे,योगेश मैलागींरे,कृष्णा माळेगावकर आदी असंख्य कार्यकर्ते होते.