नांदेड प्रतिनिधी, २३ :- माजी सैनिक, विधवा व सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८९१८७७४८८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते. सध्या हे प्रवेश फक्त सैनिक/माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.