नांदेड प्रतिनिधी, दि. २३:- जिल्ह्यात बुधवार २२ जून रोजी सकाळी १० वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी १२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ८७.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बुधवार २२ रोजी सकाळी १० वा. संपलेल्या गत २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- ३७.३ (८३.३), बिलोली- ०.६ (५८.१), मुखेड- १.४ (१०५), कंधार-१.५ (१०७.७), लोहा-१.२ (६९.५), हदगाव-२८.३ (७४.५), भोकर- ३.७ (६९.९), देगलूर-०.३ (१२८), किनवट- १८.५ (१००), मुदखेड- २७.३ (१३०.७), हिमायतनगर-४२.२ (९६.३), माहूर- ४.५ (८९), धर्माबाद- ७.६ (५०.३), उमरी- १९ (१००.७), अर्धापूर- १७.८ (६४.५), नायगाव- १.० (५१.४) मिलीमीटर आहे.