प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर अशासकीय सदस्य नेमणुक करण्यासाठी अर्ज सादर करावेत

 

नांदेड प्रतिनिधी, दि. १३ :- मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ६८अन्वये प्रादेशिक परिवहन प्राधिकरण गठीत करण्यात आले आहेत. यानुसार अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत वाहतूक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या कामाबाबत पुराव्यासह अर्ज रविवार १७  जुलै २०२२ पर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय एमआयडीसी सिडको येथे सादर करावा.

ज्या व्यक्तीचा परिवहन उपक्रमात मालक किंवा कर्मचारी म्हणून किंवा अन्यथा कोणताही आर्थिक हितसंबध असेल, अशी कोणतीही व्यक्ती राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून नियुक्त करता येणार नाही यांची सदस्यांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *