नांदेड प्रतिनिधी, दि. १७ :- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना म. लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यासाठी १ ते १५ जुलै २०२२ या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आले आहेत.
ही निवडणूक प्रक्रिया १५ जुलै पासून ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वरील शासन आदेशान्वये पुढे ढकल्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिली.