मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम १४४ लागू

नांदेड  दि. २० :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून २० जुलै ते १९ ऑगस्ट २०२२ पर्यत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा २० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपासून ते १९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *