नांदेड प्रतिनिधी, दि. ०७ :- नायगाव खै. तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीपात्रामध्ये वीटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकर, वीटभट्टी चालक, रेती, मुरूम उत्खनन करणाऱ्यांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश ६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ५ ऑक्टोंबर २०२२ रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहिल.