कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी

नांदेड  दि. २३ :- औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी २० माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह (डिस्चार्ज बुकची प्रत, आर्मी व सिव्हिल हेव्ही व्हेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी) उपस्थितीत रहावे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता

सैन्य दलातील ट्रेड DSV (Spl Veh)/ AM-50/ Dvr/ Dvr (MT)/ DMT/ Dvr GNR/ Dvr (AFT) यापैकी असावा. दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे. वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSVBUS (TRV-PSV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या / नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा. सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान १५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मेडिकल कॅटेगरी SHAPE-I. वयोमर्यादा ४८ वर्षे आहे. माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ४१, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दुरध्वनी ०२४०-२३७०३१३ या पत्यावर / दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *