परभणी प्रतिनिधी,दि.०३ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संबंधित ग्रामसेवकांनी शिबिरांचे आयोजन करून ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेवून त्यांना ओळखपत्र वितरणाकरीता दि. १ ते १० सप्टेंबर, २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिम अंतर्गत शिबिराच्या पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील सायाळा खटिंग येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार सुनील परसोडे यांना ऊसतोड कामगार योजनेचे पहिले ओळखपत्र परभणी जिल्ह्यात वितरीत करण्यात आले.
या शिबिराचा लाभ घेवून पात्र ऊसतोड कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह (धारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो इ.सह) आपल्या गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधून आपले ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी गीता गुठ्ठे यांनी केले आहे.