अकोला प्रतिनिधी, दि.०३ – उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी तथा निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
त्यात उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार (अध्यक्ष), शासकीय / शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी तसेच ढोणे चित्रकला महाविद्यालयचे प्राचार्य श्री. गजानन बोबडे (सदस्य), महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. होळकर (सदस्य), जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. असोले (सदस्य), जिल्ह्यातील पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक (गृह) नितीश शिंदे (सदस्य) यांचा समावेश असून
या समितीने जिल्ह्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांचे गुणांकन राज्य समितीकडे दि. १३ सप्टेंबर पर्यंत पाठवावे,असे आदेशात म्हटले आहे.