हिंगोली प्रतिनिधी, दि. ०८: राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा गौण व खनिकर्म अधिकारी रविंद्र मारबते, तहसीलदार सर्वश्री. संदीप राजपूरे, जीवककुमार कांबळे, कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.